
दमिश्क, दि. १९ – सिरीयाची राजधानी दमिश्कमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे अल् कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी बोलून दाखविला.
या स्फोटात ५४ जण मृत्यूमुखी पडले होते. तर सुमारे ३७० नागरिक गंभीर जखमी झाले होते. गेल्यावर्षी पासून राष्ट्रपती बशर अल हसद यांच्या विरोधात सुरू असलेल्या उठावादरम्यान झालेला हा सर्वात भीषण स्फोट ठरला आहे.