एल अँड टी कन्स्ट्रक्शनला २५९२ कोटींची ऑर्डर

मुंबई, दि. १९ – एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग अँड फॅक्टरीज आय.सी. विभागास २०१२-१३ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण २५९२ कोटी रूपयांच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. निवासी बांधकाम क्षेत्रातील देशातील एका प्रमुख विकासकाकडून बंगळुरू आणि गुरगाव शहरात बहुमजली निवासी टॉवर बांधण्याचे १२०६ कोटी रूपयांचे कंत्राट कंपनीस मिळाले आहे. तसेच व्यापारी इमारत बांधकाम क्षेत्रात देशातील प्रमुख शहरांमध्ये हॉस्पिटल इमारत आणि इतर संस्थांच्या इमारती बांधण्याचे ११६५ कोटी रूपयांचे कंत्राटही कंपनीस मिळाले आहे. देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनीसाठी कारखाने उभारण्याचे २२१ कोटींचे कंत्राटदेखील एल अँड टी कंपनीच्या बांधकाम विभागाला मिळाले आहे.

Leave a Comment