भारतीय महिला तिरंदाज निशाला क्रीडा मंत्रालयाकडून अर्थसहाय्य

नवी दिल्ली, दि. १७ – भारताची महिला तिरंदाज निशा राणी दत्ता हिच्या गरीब परिस्थितीची दखल घेत युवाकल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून तिला पाच लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या कच्या घराच्या दुरूस्तीसाठी तिला तिचा धनुष्य विकायची वेळ आली होती, हे वृत्त मंत्रालयाला समजताच अर्थसहाय्य पुरविण्यात आल्याचे स्पष्टीकरण क्रीडामंत्री अजय माकन यांनी दिले. निशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता खेळाडूंसाठी असलेल्या नॅशनल वेल्फेअर फंडामधून ही रक्कम तिला देण्यात आली

Leave a Comment