आयपीएल सोडून पीटरसन परतला

    आयपीएल स्पर्धा आता रंगत आली आहे. शेवटचे काही सामने शिल्लक राहिल्याने स्पर्धेबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अशातच इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज व दिल्ली डेअर डेव्हिल्सचा आधारस्तंभ असलेला केवीन पीटरसन स्पर्धा सोडून इंग्लंडला परतला आहे.
    काही दिवसातच इंग्लंड व वेस्टइंडिज दरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याच्या तयारीसाठी इंग्लंडचा भरवशाचा फलंदा पीटरसन परतला आहे. त्याच्या परत जाण्याने दिल्ली डेअर डेव्हिल्सची विजयी घोडदौड सुरू राहणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली आहे. आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये त्याने दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून बोलताना ८ सामन्यात ३०५ धावा केल्या आहेत. त्याचे आत्तापर्यंतच्या प्रदर्शनामुळे दिल्लीला बर्‍याच सामन्यात विजय मिळविता आला आहे. त्याने दिल्लीकडून खेळताना मधल्या फळीची भिस्त सांभाळली होती. २० गुण मिळवीत दिल्ली संघाने उपांत्यफेरी गाठली आहे. त्यामुळे उर्वरित सेमी फायनलमध्ये तो खेळेल असे सर्वांना वाटत होते. पण तो भारत सोडून बुधवारी परतला.
    पीटरसनने भारत सोडताना दु:ख होत असल्याचे ट्विटरवरून म्हटले आहे. दिल्लीडेअर डेव्हिल्सकडून खेळताना भारतीय प्रेक्षकांनी प्रेम व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचे ऋण विसरू शकणार नाही. यावेळेसची आयपीएल स्पर्धा दिल्ली डेअर डेव्हिल्सला जिंकून देण्याचे माझे स्वप्न होते. मात्र वेस्ट इंडिजविरुद्च्या मालिकेमुळे ते मला शक्य झाले नाही. मात्र माझ्या गैरहजेरीत दिल्ली संघ स्पर्धा जिंकेल असा विश्‍वास त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे.

Leave a Comment