आता सासूची कॉपी करणार करीना

    अभिनय करताना अभिनेत्यांना काय काय तरी करावे लागते. ‘चमेली’ मध्ये भुमिका करताना करीना कपूर तोंडात सिगारेट धरून सिगारेट ओढण्याची सवय करून घेत होती. आता तिला आगामी काळात येवू घातलेल्या तिच्या बहुचर्चीत ‘हिरोईन’ या  चित्रपटात सासू शर्मिला टागोर हिने मौसम चित्रपटात केलेल्या अभिनयाची कॉपी तिला आता करायची आहे.
    मधुर भांडरकरचा ‘हिरोईन’ हा चित्रपट काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतो. ऐश्‍वर्या रॉयने सोडलेली भूमिका करीना सध्या साकारत आहे. या चित्रपटासाठी सध्या तरी तिची सासू म्हणजेच सैफ अली खानची आई शर्मिला टागोर हिच्याकडून काही टिप्स घेत आहे. मागील दशकात शर्मिलाने ‘मौसम’ चित्रपटात चंदा व कजरी अशी दुहेरी भूमिका केली होती. एक शहरी व एक ग्रामीण युवतीची ही भूमिका होती. त्याच धर्तीवर ‘हिरोईन’ या चित्रपटात करीनाची भूमिका असणार असल्याचे समजते. याबाबत करीना व मधुर भांडरकर दोघेही फारसे पत्ते खोलण्यास तयार नाही. मात्र ती शर्मिला कडून काही टिप्स करीना घेत असल्याचे पाहून काहींनी या चित्रपटात तिचा डबल रोल असावा अशा स्वरूपाचा अंदाज वर्तविण्यास सुरूवात केली आहे.
    योगायोगाने हे जर खरेच ठरले तर करीनाला ग्रामीण भागातील तरूणीची भूमिका साकारण्यासाठी सासूबाई शर्मिलाकडून गांवडाळ भागातील यूवती ज्या शिव्या देतात ते सुद्धा शिकावे लागणार आहे. त्यामुळे ‘हिरोईन’ रिलीज झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने करीनाने सासूबाईकडून काय टिप्स घेतल्या आहेत, हे खर्‍या अर्थाने समजणार आहे.

Leave a Comment