‘स्टार टॉक’च्या चॅटसेवेवर नव्या सेलीब्रिटींचे आगमन

मुंबई, दि. १८ मे- रिलायन्स कम्युनिकेशन्सने रिलायन्स ग्राहकांसाठी विश्वचषक क्रिकेट संघातील विक्रमवीर वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत चॅट करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या सेवेत आता नव्या सेलीब्रिटींची भर पडली आहे. स्टार टॉक कार्यक्रमात बॉलीवूड, क्रीडा, गायन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
   रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मूल्यवर्धित सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख कुणाल रामटेके यांनी या संदर्भात सांगितले की, आम्ही नेहमीच भारतीय ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा परवडणार्‍या दरात देण्याचे प्रयत्न केले आहेत. आमची ’स्टार टॉक’ सेवादेखील याच तत्वाला अनुसरून आहे. आयव्हीआरवर ही सेवा देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सध्या अनिल कपूर, हृतिक रोशन, इमरान हाश्मी, कंगना रानावत, मनीषा लांबा, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि श्वेता तिवारी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा ’स्टार टॉक’मध्ये समावेश असून त्यात आता आणखी भर टाकण्यात आली आहे.
  ’स्टार टॉक’ सेवा उपलब्ध करण्यासाठी माफक शुल्क आकरण्यात आले असून ते दरमहा १० रूपये ठेवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक सेलीब्रिटीमागे ३० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर रिलायन्स ’स्टार टॉक’ अॅक्टिव्हेट करण्यासाठी ५३०३१३३३ किवा ५३०३१ क्रमांकावर संपर्क साधावा. या कॉलसाठी प्रतिमिनिट फक्त १० पैसे दराने शुल्क आकारण्यात येईल.

Leave a Comment