सलमान गुंतला जुन्या प्रेमिकेच्या सेवेत

    सलमान खान म्हटले की, त्याच्या लग्नाच्या वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास मिळतात. आतापर्यंत त्याच्या कितीतरी प्रेमिका झाल्या. पण शेवटपर्यंत त्याचे एकीशीही संबंध टिकले नाहीत. मात्र आता सलमान खान त्या प्रेमिकांना विविध कार्यक्रम व पार्ट्यात बोलावून त्यांची सेवा करीत आहे.
    काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याची पूर्व प्रेमिका सोमी अलीला बरीच मदत केली. तिच्या सामाजिक संस्थेत त्याने मदत मिळवून दिली आहे. तिने केलेली ही मदत ती विसरू शकत नाही. अशी प्रतिक्रिया सोमी अलीने व्यक्त केली. ही मदत देवून काही दिवस उलटले नाहीत तोच सलमानने तिच्या आणखी एका प्रियेसीची मदत केली.
    एके काळी संगीता बिजलानी व सलमानच्या प्रेमप्रकरणाची चर्चा संपूर्ण चित्रपटसृष्टीत होती. ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून त्यांची केमेस्ट्री चांगलीच रंगली होती. मात्र त्यानंतर कुठे माशी शिंकली माहित नाही. त्या दोघांची बिनसल्यानंतर संगिताने क्रिकेटपटू मोहंमद अझरूद्दीन सोबत विवाह केला.
    सलमानने ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या शुभारंभानिमित्त पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सर्वच स्टार मंडळी सोबत संगीता बिजलानीला ही पार्टीचे निमंत्रण दिले होते. ती ही पार्टीला आली होती. यावेळी सलमानने तिची आपलेपणाने चौकशी तर केलीच, शिवाय संपूर्ण कुंटूबियाला तिची खास काळजी करण्यास सांगितले. हे सर्व पाहून संगीता ही काही काळ भारावून गेली होती. जाताना संगिताने सर्वांनी तिची घेतलेल्या काळजीबद्दल सलमानचे आभार मानले. सध्या त्याने सोमी अली व संगीता बिजलानी या दोघींचे ऋण फेडले आहे. आता तो ऐश्‍वर्या रॉय व कॅतरिना कैफ यांच्याशी आगामी काळात कसा वागतो याबद्दल उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment