संजयदत्तने शर्मनला दिली फेरारी

फेरारी की सवारी या चित्रपटाविषयी जनतेत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे. संजय दत्त याने मोठ्या मनाने आपली फेरारी या प्रमोशनदरम्यान वापरण्यासाठी शर्मन जोशीच्या हवाली केली असून शर्मनच्या मैत्रीसाठी हे केले असल्याचे समजते.
 शर्मन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.
  चित्रपटाचा निर्माता विधू विनोद चोप्रा आणि संजय दत्त जवळचे मित्र आहेत. विधूनेच शर्मनची ओळख संजयशी करून दिली आणि काय , दोघांचे अगदी छान मेतकूटच जमले. संजयदत्त पूर्वीपासूनच कुणालाही मदत करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मग शर्मन तर त्याचा दोस्तच नां!
फेरारी की सवारीच्या प्रमोशनसाठी जिथे जायचे तेथे फेरारी घेऊनच जाण्यास संजयने त्याला सांगितले आहे. नुसते सांगूनच तो थांबलेला नाही तर गाडी कशी चालवायची याचे शिक्षणही त्याने शर्मनला दिले असल्याचे समजते. पण मित्रप्रेम म्हणा की आणखी काही, संजयदत्तने पाच कोटी रूपये किमतीची ही गाडी शर्मनचा हाती सहज सोपविली आहे हे मात्र खरे !

Leave a Comment