लवकरच परतणार काजल

    कुंटुबियाकडे व लहान मुलांकडे लक्ष देण्याच्या कारणावरून काजोलने काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले होते. आता मात्र तिने चांगली स्क्रिप्ट मिळाली तर दुसर्‍यांदा पुन्हा चित्रपटसृष्टीत येण्याची तयारी दर्शवीली आहे.
    तिने न्यासाच्या जन्मानंतर ‘माय नेम इज खान’ हा शाहरूख खान सोबत चित्रपट केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांनाही आवडला होता. त्या चित्रपटानंतर तिने न्यासा व युगला वेळ देण्यासाठी चित्रपटातून संन्यास घेतला होता.
    काजलने खर्‍या अर्थाने तिच्या वयाच्या २४ व्या वर्षानंतर लग्न करून चित्रपटसृष्टीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तसे काजलला करता आले नाही. अजयसोबत विवाह केल्यानंतर बराच काल ती चित्रपटात काम करीत होती. त्यामुळे तिला कुटुंबियासाठी जादा वेळ देण्याची योजना आखली आहे.
    सध्या तिला चित्रपटात येण्याची जरी उत्सूकता लागली असली तरी स्क्रिप्ट पसंत पडल्याशिवाय ती पर्दापण करणार नाही. दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याबाबत तिने नकार दर्शविला असून ते तिचे क्षेत्र नसल्याचे ती मान्य करते. कुटुंबाची देखभाल करीत असताना व्यायाम व डायटिंग करून तिने प्रकृतीची काळजी घेतली आहे. पुनरागमन करते वेळी पती अजय देवगण अथवा शाहरूख खान सोबत काम करण्यास आवडेल असे तिचे मत आहे.

Leave a Comment