राष्ट्रपती निवडणूक उमेदवार निवडीबाबत राष्ट्रवादी युपीए बरोबरच-शरद पवार

मुंबई दि. १८-राष्ट्रवादीचे नेते संगमा यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठींबा असल्याचे जयललिता आणि बिजू पटनायक यांनी काल जाहीर केले असतानाच आज म्हणजे शुक्रवारी शरद पवार यांनी राष्ट्रपती निवडणूक उमेदवार निवडीबाबत राष्ट्रवादी यूपीएसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
संगमा आणि शरद पवार यांची आज सकाळी भेट झाली तेव्हा पवार यांनी राष्ट्रवादी यूपीएचाच भाग असल्याचे मात्र संगमांच्या सूचनांचा विचार केला जाणार असल्याचे सांगितले.
   संगमा यांना जयललिता आणि पटनायक यांनी पाठिबा जाहीर केल्यावर संगमांबरोबर कोणतीही बोलणी न झाल्याचा खुलासा कालच पवार यांनी केला होता. तसेच इतक्या मोठ्या पदाच्या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाची ताकद पुरेशी नाही असेही स्पष्ट केले होते. मात्र तरीही २००४ पासून राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये कळीची भूमिका निभावत आहेच तसेच महाराष्ट्रातही काँग्रेस सोबत सत्ता उपभोगत आहे या बाबी विसरता येणार नाहीत असे तज्ञांचे मत आहे.
 संगमा यांनी पवार यांच्याशी बोलणे झाल्याचे मान्य केले असून ते म्हणाले की पुढचा राष्ट्रपती अनुसुचित जमातीचा असावा असा आग्रह धरणार्‍या फोरमचे ते सदस्य आहेत. तसेच भाजपचे करिया मुंडा, काँग्रेसचे केंद्रीय मंत्री कृ ष्णचंद्र देव व माजी नागा लँड मुख्यमंत्री एस.सी.जमीर  माजी केंद्रीय मंत्री अरविद नेताम यांच्यापैकी कुणीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरू शकतो असे त्यांनी पवार यांना सागितले आहे.