ऐश्‍वर्याला मोठी म्हटल्यावर येतो लाराला राग

    ऐश्‍वर्या रॉय व लारा दत्ताची डिलेव्हरी घेवून दोन-तीन महिने उलटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डिलेव्हरीनंतर ऐश्वर्या जाड झाली आहे, यावरून प्रसार माध्यमात चर्चा रंगली आहे. याचचर्चेमुळे ऐश्‍वर्या नाही तर लारा दत्ता चांगलीच वैतागली आहे.
    प्रसारमाध्यमांनी अथवा पुरुषांनी एखाद्या स्त्रीबद्दल अपशब्द काढू नये असे लाराचे म्हणणे आहे. लारानी डिलेव्हरीनंतर व्यायाम व योगा केल्याने ती फीट राहिली आहे. डिलेव्हरीनंतर लाराने पूर्वीप्रमाणे तिची फिगर मेन्टेन केली आहे. त्यामुळे सर्वांनाच तिची तब्येत पाहून आश्‍चर्य वाटत आहे.
    ऐश्‍वर्या रॉयने डिलेव्हरीनंतर योगा व थोडीशी काळजी न घेतल्याने तिचे काही प्रमाणात वाढले असेल आता तिने व्यायाम व योगा केला तर वाढलेले वजन निश्‍चितच कमी होईल असे लाराला वाटते. वाढलेल्या वजनाबद्दल कोणालाच अपशब्द काढण्याचा अधिकार नसल्याचे लाराने स्पष्ट केले आहे.
    अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या प्रेग्नंट आहे तिला मी काही योगाच्या सीडी व काही व्यायामाच्या टीप्स दिल्या आहेत. त्यामुळे तिचे वजन डिलेव्हरीनंतर वाढणार नाही. आगामी काळात आई होणार्‍या प्रत्येक अभिनेत्र्यांना ही योगाची सीडी गिफ्ट देणार असल्याचेही तिने सांगितले.
    पूर्वीपासून फिटनेस ट्रेनर असल्याचा फायदा मला झाला असून त्यामुळे मला डिलेव्हरीनंतर पूर्वीसारखीच तब्बेत मेन्टेन करण्यात यश आले आहे. आगामी काळात लाराचा फिटनेस सेंटर उघडणार असून त्याच्या माध्यमातून अनेकांना योगाबाबत प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.

Leave a Comment