लेडी बॉसचा ट्रेंड येतोय

    चित्रपटासोबतच आता मालिकामध्येही नव्याने लेडी बॉसचा ट्रेंड येत आहे. सध्या मालिकेचा नायक आणि त्यांना आदेश देणार्‍या लेडी बॉस असे काहीसे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
    पूर्वी यावर आधारित बरेच चित्रपट झाले त्यापैकी काही चित्रपट हिटही झाले. ‘लाडला’मध्ये अनिल कपूरची बॉस श्रीदेवी होती. ‘ऐतराज’ चित्रपटात प्रियांका चोप्रा ही अक्षयकुमारची बॉस दाखविण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे कथानक प्रेक्षकांना आवडते हे लक्षात झाल्यानंतर आता अशा स्वरूपाचा लेडी बॉसचा फार्म्यूला आता छोट्या पडद्यावरही दाखवला जात आहे.
    छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या ‘बडे अच्छे लगते है’ मध्ये विक्रमची बॉस लेडी झाली आहे. सध्या हॅरी ही भूमिका करीत आहे. विक्रमच्या बायकोला वाटते की, विक्रम व हॅरीचे अफेअर सुरू आहे. ‘क्या हुआ तेरा वादा’ मध्ये प्रदीपची लेडी बॉस अनुष्का आहे. अनुष्काची भूमिका मॉली गांगूलीने केली आहे. प्रदिपची बायको आपली मुले बॉसकडून ठेवून नोकरीच्या शोधात असलेली पाहावयास मिळते.
    मालिकेत सध्या लेडी बॉस दाखवून हिरो आणि तिच्या विवाहबाह्य संबंधाची चर्चा सुरू होते. याचा वापर मालिकेचा टीआरपी रेटिंग वाढविण्यासाठी कप्प्यात येत आहे. मराठी वाहिन्यावर सध्या असा ट्रेंड सुरूच आहे. अरूंधतीमध्ये अश्‍विनी एकबोटे ही कंपनीची मालक दाखविण्यात आली आहे. ‘लक्ष्य’ मध्ये सीनिअर पोलिस अधिकार्‍याची भूमिका करीत आहे. तर ‘चार दिवस सासूचे’ मधल्या आशालता देशमुख चार कंपन्याचा कारभार सांभाळत असल्याचे, दाखविण्यात आले आहे.

Leave a Comment