रावडी राठोड मधून झळकणार करीना

    प्रसिद्ध अभिनेता व कोरियोग्राफर प्रभू देवा दिग्दर्शित ‘रावडी राठोड’ या ऍक्शन चित्रपटात अक्षयकुमार व सोनाक्षी सिन्हा या दोघांची जोडी पहिल्यादांच झळकणार याची माहिती सर्वांना होती. मात्र या चित्रपटातून करीना कपूर ही झळकणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्रभू देवानी दिल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता सर्वांना लागली आहे.
    ‘रावडी राठोड’ या चित्रपटातील ऍक्शन बाबत सर्वांना सुरूवातीपासून आकर्षण आहे. त्यासोबतच या चित्रपटात `दबंग’ चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात करणारी सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच अक्षय सोबत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्या सोबतच या चित्रपटातून करीना कपूर छोटीसी भूमिका करणार आहे. यापूर्वी करीनाने अनेक चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. करीनाची ही भूमिका सर्वांना आवडेल अशी असणार आहे.
    यापूर्वी अक्षयकुमार व करीना कपूरची जोडी रूपेरी पडद्यावर हिट ठरली आहे. प्रेक्षकांनाही केमेस्ट्री आवडल्याने या दोघांचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. यापूर्वी `ऐतराज’, `बेवफा’,  `कमबक इश्क’  आणि `टशन’ हे चित्रपट दोघांनी एकत्रित करताना बॉक्स ऑफिसवर यशही मिळवून दिले आहे. ही दोघांची जोडी लकी ठरल्याने दिग्दर्शक प्रभु देवांनी ‘रावडी राठोड’ मधून करीनाला छोटीसी भूमिका दिली आहे. यापूर्वी चित्रपटातून एखादे आयटम सॉंग वेगळ्या नायिका करीत होत्या. मात्र आता ‘रावडी राठोड’ या चित्रपटापासून नायिकांना छोटी भूमिका देण्याचा ट्रेंड चित्रपटातून येत आहे.

Leave a Comment