मंदिरा बेदी कन्या दत्तक घेणार

 आपली मंदिरा बेदी आठवतेय ना! तिचा मुलगा वीर आता १७ जूनला एक वर्षाचा होतो आहे. मुलाचा पहिला वाढदिवस म्हटले की अनेक कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. त्यातून तो सेलिब्रिटीचा मुलगा किवा मुलगी असेल तर बघायलाच नको. पण मंदिराने मात्र वीरच्या पहिल्या वाढदिवसाचा वेगळाच कार्यक्रम आखला असून त्याला एक छोटी बहिणच ती आणणार आहे. मंदिरा सांगते, वीरच्या जन्माच्या आधीपासून म्हणजे आमचे लग्न झाले तेव्हाच मी आणि राज कौशल ने एक मुलगी दत्तक घ्यायची असा निर्णय घेतला होता. लग्नाला बारा वर्षे होईपर्यंत तिनेच बाळ न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. आता वीर एक वर्षाचा होतोय. त्याला लहान बहिण हवीच. म्हणून त्यांनी दत्तक देणार्‍या संस्थेकडे संपर्क साधला असून मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सर्व कागदपत्रे आणि अन्य बाबी पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ लागेल असे ही ती सांगते.
 वीरच्या जन्मानंतर आमच्या जीवनात जणू आनंदाची भरती आली आहेच पण जगण्यासाठी एक नवे चांगले कारण आम्हाला मिळाले आहे असेही मंदिराचे म्हणणे आहे.

1 thought on “मंदिरा बेदी कन्या दत्तक घेणार”

Leave a Comment