कर्णधार बदलण्याचा नवा ट्रेंड

    आयपीएलच्या प्रत्येक भागात नवीन असा काहीतरी ट्रेंड येतोच असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आयपीएलच्या या पाचव्या सीझनमध्ये अर्ध्यातूनच कर्णधार बदलण्याचा नवीन ट्रेंड आलेला पहावयास मिळत आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या नऊ पैकी तीन संघाने कर्णधार बदलले आहेत. अजुन १५ दिवस शिल्लक असून अजुन किती संघात अशा स्वरूपाचे फेरबदल होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
    आयपीएलची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडून सहकारी हरभजन सिंगला संधी दिली. सचिनने त्याची इच्छा नसल्याने कर्णधारपद स्वत: निर्णय घेवून हरभजन सिंगकडे सोपविले. मात्र इतर संघात निर्णय घेवून हरभजन सिंगकडे सोपविले. मात्र इतर संघात वेगळी परिस्थिती आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्टकडे होते. त्याने काही सामन्यात कर्णधार पदाची धुराही संभाळली. मात्र अचानक त्याच्याकडून कर्णधारपद काढून ऑस्ट्रेलियाचा त्याचा सहकारी डेव्हीड हसी कडे सोपविण्यात आले.
    बेंगळरू रॉयल चँलेजर्सचे कर्णधारपद दोन तीन सिझनपासून न्युझिलंडच्या फिरकी गोलंदाज डॅनिअल व्हिटोरीकडे आहे. मात्र संघात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथ्यय्या मुरलीधरन संधी दिल्याने व्हिटोरीला संघाबाहेर बघावे लागले. त्यामुळे कर्णधार म्हणून विराट कोहलीकडे सूत्रे आहेत. दुसरीकडे अपयशी ठरल्याने पुणे वॉरियसर्च कर्णधार पद सौरभ गांगूलीकडून काढून स्मिथकडे सोपविण्यात आल्याने या सीझनमध्ये कर्णधार बदलण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे की काय, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Leave a Comment