इम्रानच्या अभिनयात प्रगल्भता

    सुरूवातीच्या काळात इम्रान हाश्मी म्हटलं की, त्याचे ‘सिरीयल किस’ सीनचीच सर्वांना आठवण होते. मात्र त्याने त्याची ही प्रतिमा अभिनयाच्या जोरावर पुसून टाकली आहे. दिवसेंदिवस त्याच्या अभिनयात प्रगल्भता येत असून, त्याने काही हिट चित्रपट देवून यशस्वी कलाकार असे वेगळा ठसा उमटविला आहे.
    गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खात्यात ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘मर्डर – २’ व ‘ द डर्टी पिक्चर’ हे दर्जेदार चित्रपट त्याच्या नावावर आहेत. या चित्रपटाच्या माध्यामातून मोठा गल्ला जमविला आहे. या चित्रपटातून त्याने सुरूवातीला निर्माण झालेली ‘सिरीयल किसर’ ही प्रतिमा बदलली आहे. त्याने या चित्रपटासाठी बरीचशी मेहनत घेतली आहे. त्याच्या अभिनयाची चर्चाही चित्रपटसृष्टीत सुरू झाली आहे. नाही तर एवढे दिवस त्याच्या अभिनयाकडे कोणी साधे लक्षही देत नव्हते.
    इम्रानकडे आगामी काळातही बरेच हिट चित्रपट येत आहेत. ‘शांघाय’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तो प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यासोबतच येत्या काळात त्याचे ‘इश्श’, राज-२’, ‘घनचक्कर’ व ‘डायन’ हे चित्रपट येत आहेत. त्यामुळे आगामी काळ त्याच्या हिट चित्रपटाचा येणार आहे.
    ‘शांघाय’ या चित्रपटात तो अभय देओल सोबत चमकणार आहे. या चित्रपटाकडून त्याच्या बर्‍याचशा अपेक्षा आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी बरीचशी मेहनत घेतली असून अभय देओल सोबत त्याची चांगलीच जोडी जमली आहे. दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी यांच्याशी इम्रानचे सूत चांगलेच जमले आहे. त्यामुळे ‘शाघांय’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरणार आहे.