सैन्यदलाच्या धर्तीवर नक्षलवाद्यांची बटालियन, छोट्या शहरांना करणार टार्गेट

नागपूर, दि. १६ – नक्षलवादी आता आपल्या घातपाती कारवाया देशात तीव्र करणार असून, सैन्यदलाच्या धर्तीवर नक्षलवाद्यांचे बटालियन तयार करुन छोट्या शहरांना टार्गेट करणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी आपली योजना तयार केली असून २०५० पर्यंत काय करायचे याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. नक्षलवाद्यांच्या बटालियनमुळे सरकारची डोकेदुःखी वाढणार आहे.
     नक्षलग्रस्त भाग सोडून नक्षलवादी देशातील छोट्या शहरात बटालियनच्या माध्यमातून टार्गेट करणार आहेत. देशातील १२ राज्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आपले जाळे पसरवले आहे. जेथे केंद्र सरकारचे अधिकारी पोहचू शकत नाही तेथे नक्षलवादी पोहोचले आहेत. नक्षलवाद्यांनी आपला अर्बन प्लॅन तयार केला आहे. केंद्र सरकारने विविध राज्यात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अर्धसैन्य दलाचा वापर सुरु होण्यामुळे त्यांनी दलम मागोमाग बटालियन तयार केले आहे. नक्षलवाद्याजवळ २० हजार नक्षलवादी असून अत्याधुनिक शस्त्राच्या जोरावर २० बटालियन तयार करुन छोट्या शहरांवर अचानक हल्ला करण्याची तयारी नक्षलवाद्यांनी सुरु केली आहे. आजपर्यंत नक्षलवादी प्लॅटून आणि दलमच्या मदतीने घातपाती कारवाया करीत होते. पण सरकारला उत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांची बटालियन सज्ज झाली आहे.
    देशात केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी ७३ पॅरामिलिट्री, २७ इंडिया रिसर्च बटालियन व १० कोबरा बटालियन तयार केल्या आहेत. नक्षलवाद्यांनी आपली शक्ती वाढविण्यासाठी एका बटालियन १२०० नक्षलवादी तयार केले आहेत. जेहनाबाद येथील तुरुंगातून ३७५ कैद्यांना या बटालियनच्या भरोवशावर बाहेर काढले आहे. या कैद्यांमध्ये सर्वात जास्त माओवादी होते. या बटालियनच्या माध्यमातून छोट्या शहरावर हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रभाव राहणार आहे.

Leave a Comment