कॉंग्रेसवर टीका करण्याचा अण्णांना अधिकार नाही – नितीन राऊत

औरंगाबाद, दि. १७ – कॉंग्रेसवर टीका करण्याचा अण्णा हजारे यांना काहीच अधिकार नाही. मात्र, ते सतत कॉंग्रेसची आणि नेतृत्वाची बदनामी करत असतात. त्यांच्या प्रचार साहित्यात कॉंग्रेस नेतृत्वावर टीका केल्यानेच युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगफेक केली. त्या युवकांचे मी समर्थन करतो, अशा शब्दात कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी अण्णा हजारे यांच्या गाडीवर दगडफेक करणार्‍या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या कृतीचे समर्थन केले. ते औरंगाबाद येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.

Leave a Comment