
अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांची कन्या आराध्या १६ मे रोजी सहा महिन्यांची झाली. अभिषेक आता कन्या थोडी मोठी झाल्यामुळे तिच्यासोबत खेळू शकतो आहे, तिची उस्तवार करू शकतो आहे तरीही त्याला ऐश्वर्याचा हेवा वाटतो आहे. अभिषेक सांगतो, आराध्या घरात आल्यापासून ऐश्वर्याने मला बेडरूमच्या बाहेरच काढले आहे. बाळ रात्री अपरात्री उठणार, झोपमोड होणार व त्याचा परिणाम शूटिंगवर होणार अशी कारणे ती देत असली तरी तिला अधिक काळ कन्येजवळ काढायचा आहे हेच खरे.
आजकाल ऐश्वर्याचा दिवस सुरू होतो बाळाबरोबर आणि मावळतोही बाळाबरोबरच. आराध्याची प्रत्येक गोष्ट मग ते मालिश असो, अंघोळ असो, जेवण असो, कपड्यांच्या घड्या घालणे असो की नॅपी बदलणे असो, सारे काम ऐश्वर्या स्वतःच करते. आता मीही तिला कधीकधी मदत करतो. पण ती क्वचितच.
कांही असो, मी खरा भाग्यवान आहे कारण माझ्याभोवती बायकांचा अगदी गराडा आहे असे सांगतानाच अभिषेक खुलासा करतो की माझी आजी, आई, बहिण श्वेता, तिची मुलगी, ऐश्वर्या आणि आता आराध्याही. शिवाय माझ्या काकांच्या तीन मुली म्हणजे माझ्या चुलतबहिणी आहेतच. पण ऐश्वर्याने सध्या तरी स्वतःला आराध्याला वाहून घेतले आहे. माझ्याकडे तिचे लक्ष कधी जाईल याची मी प्रतिक्षा करतो आहे. आय एम वेटिग इन ए क्यू !