मलिंगाचा श्रीलंकन बोर्डाच्या ‘अ‘ श्रेणीत समावेश

कोलंबो, दि.१३ – आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून जगातील अव्वल फलंदाजांची भंबेरी उडविणार्‍या लसिथ मलिंगाचा समावेश श्रीलंका कि‘केट बोर्डाने ‘अ‘ श्रेणी करार करणार असून, त्यामुळे त्याच्या मानधनात वाढ होणार आहे.
    श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मंलिगाचा आयपीएलमधील जबरदस्त फॉर्म पाहता बोर्डाने हा विचार केला आहे. या करारानुसार दरवर्षी १ लक्ष अमेरिकन डॉलर्स इतके मानधन मिळेल. मात्र त्याने गेल्याच वर्षी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला असून, सध्या तो केवळ एकदिवसीय व ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येच श्रीलंकन संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या करारची पूर्ण रक्कम त्याला मिळणार नसून, त्यातील ४० हजार डॉलर्स दिले जातील, असे श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डातर्फे स्पष्ट कऱण्यात आले. प्रचलित करारातील ‘अ‘ श्रेणीत महेला जयवर्धने, कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान, थिलन समरविरा या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. त्यात आता मलिंगाचाही समावेश झाला आहे.

Leave a Comment