ब्राव्होने करून दिली मियॉंदादाची आठवण

भारत – पाकिस्तान दरम्यानचे सर्वच सामने अटातटीचे होतात. दोन्ही देशाच्या समर्थकांना बाकी काही झाले तरी चालेल मात्र सामना आपल्या देशानीच जिंकावा अशी अपेक्षा असते. कोलकात्ता नाईट रायडर्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पाच धावाची गरज असताना षटकार मारून डेवेन ब्राव्होने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकल्याच्या आठवणी पुन्हा ताजा केल्या आहेत.
    १९८७ साली झालेल्या भारत-पाक सामन्यात सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता होती. त्यावेळी गोलंदाजी करीत होता भारताचा जलदगती गोलंदाज चेतन शर्मा, तर त्याच्याबरोबर उभा होता पाकचा आक्रमक फलदांज जावेद मियॉंदाद. त्यावेळी सर्वांच्या हृदयाची धडधड वाढली होती. चेतनने शेवटचा चेंडू टाकला व तो मियॉंदादाने उंच टोलावला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जातो की कॅच ठरतो हे सर्वजण बघत राहिले. चेंडू सीमारेषेबाहेर जावून पडल्याने या षटकारामुळे पाकचा संघ विजयी ठरला.
    याच क्षणाची आठवण ब्राव्होने शेवटच्या चेंडूवर पाच रन्सची आवश्यकता असताना रजत भाटियाचा चेंडूवर षटकार खेचून अटातटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल सघांतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हवा असलेला विजय मिळवून दिला. या सामन्यात शेवटच्या षटकात विजयासाठी चेन्नईला नऊ धावाची आवश्यकता होती. भाटियाने शेवटच्या षटकात कर्णधार धोनीचा त्रिफळा उडवून सामन्यात रंगत आणली होती. जडेजा-ब्राव्होला एकेरी व दुहेरी धावा घेतल्याने शेवटच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावा आवश्यक होत्या. शेवटच्या चेंडूवर ब्राव्होने षटकार खेचत विजय मिळवून दिला.

Leave a Comment