बिपाशा सोबत काम करण्याचे इशाचे स्वप्न पूर्ण

    ‘जन्नत – २’ या चित्रपटातून पर्दापण करणार्‍या इशा गुप्ताचे बोल्ड अभिनेत्री असलेल्या बिपाशा बसू सोबत चित्रपटात काम करण्याचे स्वप्न होते. तिचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असे दिसते.
    सह कॅम्पच्या वतीने लवकरच ‘राज-३’ हा चित्रपट येत असून त्यासाठी बिपाशा बसू सोबत इशा गुप्तालाही चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. `जन्नत २’ या चित्रपटातील इशाचा अभिनय पाहुन या चित्रपटात काम करण्याची तिला ऑफर दिली असल्याचे समजते.
    काही दिवसांपूर्वीच इशाच्या अभिनयाचे कौतुक बिपाशाने केले होते. त्यावेळीच तिने ‘राज-३’ या चित्रपटातील तिच्या सोबत नायिका म्हणून इशाची निवड फायनल केली होती. राज चित्रपटानंतर बिपाशा व भट्ट कॅम्पमधील संबंध ताणले गेले होते. त्यामुळे यापूर्वीच्या एक दोन चित्रपटातून बिपाशाला संधी देण्यात आली नव्हती. मात्र ‘राज-३’ च्या चित्रपटाच्या निमित्ताने भट कॅम्पने बिपाशा सोबत झालेले मतभेद विसरून तिला पुन्हा जवळ केले आहे.
    त्यामुळे आता बिपाशा झाले गेले विसरून आगामी काळात भट्ट कॅम्पच्या येणार्‍या ‘राज-३’ मध्ये झळकणार हे निश्‍चीत झाले आहे. बिपाशा परत भट्ट कॅम्पमध्ये परतणार असल्याने ‘राज -३’ हा चित्रपट हिट होईल असे वाटते. त्यासोबतच नवीन अभिनेत्री इशा गुप्ताही या चित्रपटातून झळकणार असल्याने या चित्रपट यशस्वी होईल, असे वाटत असले तरी तो बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरेल हे आगामी काळात लक्षात येईल.

Leave a Comment