
डान्स इंडिया डान्सच्या माध्यमातून पडद्यावर अधिराज्य गाजवत असलेला मिथून चक्रवती वेगळ्याच कारणाने अडचणीत आला आहे.
‘तुळका फिट’ या चित्रपटाच्या लॉचिंग निमित्त नुकत्याच एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलीवूडमधील दिग्गज मंडळीनी हजेरी लावली होती. या लेट नाईट पार्टीत सहभागी झालेल्याना मात्र मिथूनची वेगळीच कयामत पाहायला मिळाली. या पार्टीत सहभागी झालेली ‘जलापूरी’ व ‘यमराज’ या सी ग्रेड चित्रपटाची अभिनेत्री मिंक बटरला बघून तो तिच्या पुढे – मागे करीत असल्याचा दिसत होता.
एवढ्यावरच थांबेल तो मिथून कसला. यावेळी मिथूनने पार्टीदरम्यान मिंकला एकटीला गाठलेच. यावेळी तो तिच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे काहीजणांनी बघितले. यावेळी मिथून तिच्या कानात `किती वेळा फोन केला तरी तू उचलत नाहीस शिवाय बॅक कॉलही तू का करीत नाहीस’ अशी विचारणा तो तिच्याकडे करीत होता. एवढेच नाही तर पार्टीतून जाते वेळी तू मला सांगून जा असे मिंकच्या कानात पुटपुटत असताना काही जणांनी ऐकले.
या पार्टी दरम्यान ती अति उत्साहित झाल्याचेही सर्वांच्याच लक्षात आले. यापूर्वी तोपर्यंत दाखल झाल्यानंतर सभ्यपणे वागत होता. मात्र मिंकला पाहिल्यापासून तो अतिउत्साहित तर झालाच होता; शिवाय तो फ्लर्ट करीत असल्याचे लपून राहिले नाही.