
उत्तम अभिनयासोबतच लांबसडक पाय, देखणा चेहरा लाभलेल्या दीपिकाच्या केसांनीही अनेकांना भुरळ घातली आहे. लांबसडक, तजेलदार केस हे तिचे आणखी एक बलस्थान बनले असून या केसांमुळेच एका नामवंत खोबरेल केस तेल बनविणार्या कंपनीने त्यांच्या जाहिरातीसाठी दीपिकाला पाच कोटी रूपये देऊ केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
दीपिकाच्या जवळच्या व्यक्तिकडून समजलेल्या माहितीनुसार विशेष मार्केट रिसर्च ने चालविलेल्या कॅम्पेनवर दीपिकाने केस न कापण्याबद्दलची सही केली होती आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे तिने अनेकांनी सूचना देऊनही केसांना कात्री लावली नव्हती. अखेर तिची ही निष्ठा पाहून या नामवंत कंपनीने तिच्याशी जाहिरातीसाठी करार केला आहे. दीपिका जशी हेल्थ कॉन्शस आहे तसेच ती केसांची व्यवस्थित निगा राखणारी आहे. म्हणूनच अनेक कमर्शियल ब्रँडच्या जाहिरातीतून विविध आकर्षक केशरचना करून ती लोकांचे आकर्षण बनू शकली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात कंपनीप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांचीही मते घेण्यात आली होती आणि त्यांनीही दीपिकालाच प्राधान्य दिले आहे असे सांगण्यात आले.