टाटा मोटर्सची जागतिक बाजारातील कामगिरी गतवर्षीइतकीच

नवी दिल्ली दि.१६- गतवर्षीइतकीच विक्री यंदाच्या वर्षात करून टाटा मोटर्सने आपले जागतिक बाजारातील विक्री ध्येय जेमतेम गाठले आहे. यंदाच्या वर्षात गतवर्षीइतक्याच म्हणजे ८७३७७ गाड्या कंपनीने विकल्या आहेत.
   लक्झरी ब्रँड जग्वार लँड रोव्हरच्या विक्रीचा आकडा यावर्षी २५१४३ वर गेला असून गतवर्षाच्या तुलनेत हे प्रमाण २९ टक्के जादा आहे. लक्झरी सेदान सेगमेंटमधील जग्वारच्या विक्रीत यंदा १७ टक्के वाढ नोंदविली गेली असून ३६०३ गाड्या विकल्या गेल्या आहेत. लँड रोव्हरच्या विक्रीत ३२ टक्के वाढ झाली असून २१५४० गाड्या विकल्या गेल्या आहेत.प्रवासी गाड्यांच्या विक्रीचा आकडा ४९३६१ आहे. त्यात सात टक्के वाढ झाली आहे. मात्र व्यावसायिक वाहन विक्रीचा आकडा घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो आठ टक्कयांनी कमी आहे. यंदाच्या वर्षात ३८००८ व्यावसायिक वाहने विकली गेली आहेत. टाटाच्या जागतिक विक्री गटात टाटा, टाटा देवू, हिस्पानो व कॅरोसिया या कंपन्यांचा समावेश आहे.

Leave a Comment