गोव्यात पंचायत निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

पणजी, दि. १६ –  गोव्यात १८४ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. या निवडणुकीसाठी ७ लाख १६ हजार ५२८ जणांना मतदानाचा अधिकार होता, तर ६ हजार ३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
    राज्यात मार्चमध्ये प्रथम विधानसभा निवडणूक व त्यानंतर बुधवारी पंचायत निवडणूक पार पडली. मतदानाच्या दरम्यान राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. १२ तालुक्यांमध्ये १४५३ प्रभागांत ही निवडणूक होती. मतमोजणी १७ व १८ मे रोजी होणार आहे.

Leave a Comment