गेल्या दहा वर्षापासून कान्स महोत्सवात सहभागी होवून तेथील वर्चस्व अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने कायम ठेवले आहे. आतापर्यंत तर तिला आव्हान देणारी दुसरी भारतीय अभिनेत्री दहा वर्षात पुढं आली नाही. यावेळेसच्या कान्स महोत्सवात ती डिलिव्हरी झाल्यामुळे सहभागी होणार की नाही, याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र ऐश्वर्या यामध्ये सहभागी होणार असल्याचे निश्चीत झाले आहे.
२००२ सालापासून ऐश्वर्या रॉयने कान्स महोत्सवाच्या रेड कार्पिटवर इंडिया क्वीन म्हणून आपला ठसा उमटविला आहे. मात्र २०१२ साली होणार्या कान्स महोत्सवात मात्र तिला सोनम कपूर व मल्लिका शेरावतचा मुकाबला यावेळी करावा लागणार आहे.
२००९ वर्षापासून या महोत्सवात अभिनेत्री सोनम कपूर ब्युटी बँड म्हणून समोर आली आहे. तर मल्लिका शेरावतनेही तिच्या अभिनायाच्या जोरावर त्याठिकाणी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या कान्स महोत्सवात ऐश्वर्या रॉय समोर खर्या अर्थाने सोनम कपूर व मल्लिकाचे आव्हान राहणार आहे. त्या दोन अभिनेत्र्याचा धसका घेतल्याने ऐश्वर्याला मनापासून कान्स महोत्सवात सहभागी न होण्याची इच्छा असतानाही तिचे याठिकाणचे स्थान डळमळीत होवू नये म्हणून ती सहभागी होत आहे.
गेल्या वेळेसही ऐश्वर्याच्या कान्स महोत्सवात सहभागी होण्यावरून बरेचसे वादळ उठले होते. शेवटच्या क्षणी ऐश्वर्या रॉय कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अवतरली होती.