अभिनेत्री रेखा यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

नवी दिल्ली, दि. १५- सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्यात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेत ९९ क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. रेखा यांनी ११ वाजता इंग्रजीतून शपथ घेतली.अभिनेत्री रेखा या अर्धा तास आधीच संसद भवनात पोहोचल्या. त्यांच्या समवेत काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला होते. संसदेच्या दरवाजावर माध्यमातील प्रतिनिधींची झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेवून रेखा यांना दुसर्‍या दरवाजाने आतमध्ये नेण्यात आले.
रेखा यांना राज्यसभेत मिळालेला आसन क्रमांक लक्षात घेवून अभिनेत्री जया बच्चन यांनी आपला ९१ हा आसन क्रमांक बदलून द्यावा, अशी विनंती केली होती, असे सांगण्यात येते. आता जया बच्चन यांचा आसन क्रमांक १४३; तर रेखा यांचा आसन क्रमांक ९९ आहे.
रेखा समवेत राज्यसभेवर नियुक्ती झालेला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर उद्या म्हणजे बुधवारी सदस्यत्वाची शपथ घेणार असल्याचे समजते.

Leave a Comment