होंडाची ड्रिम युग मोटरसायकल भारतात लाँच

गुरगांव दि.१५-दुचाकी वाहनउद्योगातील प्रसिद्ध जपानी कंपनी होंडाने त्यांची ‘ड्रिम युग” ही दुसरी मोटरसायकल आज भारतात लाँच केली असून त्याची किंमत आहे ४४ हजार ६४२. ही किंमत दिल्ली एक्स शोरूम आहे. कंपनीची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया ने या मोटरसायकलसाठी ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याची निवड केली आहे. कंपनीने त्यांचा ड्रिम ब्रँड त्याला जगभरातून असलेली मागणी लक्षात ठेवून कायम ठेवला असून कंपनी १९४९ पासून हा ब्रँड वापरत आहे.
 ही नवी मोटरसायकल इकॉनॉमिकल असून ती जादा मायलेज देणारी आहे असे भारतीय होंडा कंपनीचे अध्यक्ष व सीइओ कैता मुरामुत्सु यांनी सांगितले. ड्रीम युग ही ११० सीसीची मोटरसायकल आहे. कंपनीची याच क्षमतेची सीबी रेसर देशात चांगली खपते आहेच.  कंपनीने गतवर्षात २१.०७ लाख गाड्या विकल्या असून २०१२-१३ सालासाठी साडेसत्तावीस लाख गाड्या विक्रीचे उदिष्ट्य ठेवले आहे.

Leave a Comment