मुंबई, दि. १५ – स्पेशिअलिटी रेस्टॉरण्ट्स लिमिटेडचे समभाग १६ मे पासून भांडवली बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. या कंपनीने प्रत्येकी १० रूपये दर्शनी मूल्याचे एक कोटी १७ लाख ३९ हजार ४१५ शेअर ‘बुक बिल्डिंग’ प्रक्रीयेने विक्रीस काढले आहेत. गुंतवणूकदारांना किमान ४० समभागांसाठी अर्ज करावा लागणार असून, याहून अधिक समभाग हवे असतील, तर ४० समभागांच्या पटीतच ते घ्यावे लागतील. ही समभागविक्री १८ मे रोजी बंद होणर आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एकूण विक्रीस काढलेल्या समभागांपैकी ३५ टक्के समभाग उपलब्ध आहेत. हे समभाग मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार येथे ‘लिस्ट’ करण्यात येणार आहेत. या समभाग विक्री प्रक्रीयेसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून कोटक महिन्द्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे.