ब्रिटीश पंतप्रधानांनी सचिनची सही असलेल्या बॅटचा केला लिलाव

लंडन दि.१४- अवघ्या दोनच आठवड्यापूर्वी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या सहीची बॅट ही आपल्या आयुष्याचा मौल्यवान ठेवा आहे असे सांगणार्‍या ब्रिटनच्या पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी याच बॅटीचा चक्क लिलाव केला आहे. फ्रेंडस ऑफ इंडियाच्या स्नेहसंमेलनात बोलताना कॅमेरॉन यांनी आपली बायको संमंथा हीचा शोध घेताना आपल्याला किती त्रास पडला याविषयी कोट्या करून हसे मिळविले हते तेव्हाच सचिनची सही असलेल्या बॅटीचा उल्लेख आपल्या आयुष्यातील मौल्यवान ठेवा म्हणून केला होता. मात्र कदाचित तेव्हाच या बॅटीसाठी सुरक्षित घर हवे अशी भावना त्यांच्या मनात आली असावी.
  रवांडा क्रिकेट स्टेडियम फौंडेशनसाठी देणगी देताना कॅमेरॉन यांनी ही मौल्यवान बॅट लिलावात काढली. या बॅटीला ३४०० पौंडस म्हणजे सुमारे तीन लाख रूपये बोली मिळाली.
 कॅमेरॉन यांच्या मतदारसंघाचे अध्यक्ष ख्रिस्तोफर शेल यांचा गेल्या उन्हाळ्यात समारंभातच मृत्यू ओढवला होता. त्यांच्या स्मरणार्थ लॉडर्सच्या लाँगरूममध्ये जेवण आयोजित करण्यात आले होते तेव्हा कॅमेरॉन यांनी १लाख ३० हजार पौंड म्हणजे १.१२ कोटी रूपयांचा निधी जमवून शेल यांच्या कुटुंबियांना सूपूर्द केला. या निधीचा वापर क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी करण्यात येईल असे त्यावेळी शेल यांचा मुलगा इडो याने जाहीर केले आहे.

Leave a Comment