नोकियाच्या ल्युमिया ६१० शी सॅमसंगच्या ओम्निया एमची स्पर्धा

नवी दिल्ली दि.१४- सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स विंडो फोन ऑपरेटिंग सिस्टीमच्या सुविधेसह असलेला ओम्निया एम हा स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. नोकियाच्या ल्युमिया ६१० या स्मार्टफोनशी हा फोन स्पर्धा करू शकणार असून या दोन्ही फोनच्या किमतीही ११ हजार रूपयांच्या दरम्यानच आहेत.
  ओम्निया एम नोकियाच्या ल्युमिया ६१० पेक्षा थोडा वेगळा आहे.नोकियाच्या फोनची रॅम २५६ एमबीची असून स्क्रीन ३.७ इंच आहे. तर ओम्निया एमची रॅम ३४८ एमबीची असून स्क्रीन आहे ४ इंचांचा. दोन्ही फोनला पाच मेगापिक्सल कॅमेर्‍याची सुविधा असली तरी ओम्नियाला अतिरिक्त फ्रंट फेसिंग कॅमेराही देण्यात आला असून त्याचा उपयोग व्हिडीओ चॅटसाठी होऊ शकणार आहे असे उत्पादन विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.
  मात्र असे असले तरी नोकियाची स्टोरेज ८ जीबीची आहे तर ओम्नियाची आहे चार जीबी. ही त्रुटी भरून काढण्यासाठी ओम्नियाला विडो लाईव्ह स्काय ड्राईव्ह वर २५ जीबी मोफत ऑनलाईन स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. कुठूनही आणि कधीही स्टोरेजला अॅक्सेस मिळविता येणार असून त्यात फोटो शेअरिंग, व्हिडीओ, ऑफिस कागदपत्रे व नोंदी साठविता येणार आहेत.
  सॅमसंगने ओम्नियाची लाँच तारीख जाहीर केलेली नसली तरी प्रथम युरोप बाजारपेठेत तो उपलब्ध करून दिला जाणार आहे व नंतर बाकी जगभराच्या बाजारपेठेत तो येईल असे समजते.

Leave a Comment