आंध्र बँकेच्या एकूण व्यवसायात १६ टक्के वाढ

मुंबई, दि. १४ मे –  ३१ मार्च २०१२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षी आंध्र बँकेने एक लाख ९० हजार ५३५ कोटी रूपयांचा एकूण व्यवसाय करून यात १६ टक्के वाढ झाली आहे. बँकेने एक लाख पाच हजार ८५१ कोटी रूपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. यात १४.९ टक्के वाढ झाली. याच कालावधीत ८४ हजार ६८४ कोटी रूपयांची कर्जे दिली. बँकेच्या एकूण ठेवींशी बचत व चालू खात्यातील ठेवींचे प्रमाण २६.४ टक्के होते. मार्च अखेर संपलेल्या तिमाही अखेरीस ३२२९ कोटी रूपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून  यात २१.३ टक्के वाढ झाली आहे.

Leave a Comment