अरुणाचल प्रदेश – आसाम सीमावाद लवकरच मिटेल

इटानगर, दि. १२ – गेली अनेक वर्षे अरुणाचल प्रदेश आणि आसाम सीमेचा वाद परस्पर सामजंस्याने लवकरच मिटेल असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंरबम् यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या सीमा आयोगाच्या अनुषंगाने हा सीमावाद मिटेल असे ते पुढे म्हणाले.
    न्या. तरुण चॅटर्जी यांच्या एक सदस्सीय समिती या प्रकरणाचा अभ्यास करीत आहे. पुढील महिन्यात न्या. चॅटर्जी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटीस बोलावून हा वादावर पडदा टाकणार आहेत. आंतरराज्य सीमा आखणीसाठी केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश सरकारला १५४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर यावर्षी ९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे चिदंबरम् यांनी सांगितले.

Leave a Comment