
दमास्कस, दि. १४ – सीरियातील अल-रस्तान भागात लष्कर आणि बंडखोरांच्या संघर्षात सोमवारी २३ सैनिकांसह ३० जण ठार झाले.
सैनिकांचा समावेश असलेल्या तीन वाहनांना बंडखोरांनी उडविले असे, लंडनमधील ‘सीरियन ऑब्जरवेटरी फॉर हयूमन राइटस्’ ने सांगितले. सीरियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आखलेल्या कोफी अन्नान यांच्या शांती योजनेत बंडखोर आणि लष्कर रस दाखवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सीरियात वारंवार अशा घटना घडताना दिसतात.