
महेश भट्ट यांची पत्नी सोनी राजदान पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या मैदानात उतरत आहेत. १९९९ साली घडलेल्या नानावटी हत्याकांडावर त्या चित्रपट बनवणार असल्याची माहिती मिळाली आहे. सोनी यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘नजर’मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री मीरा, अश्मित पटेल आणि कोयल पुरी यांनी अभिनय केला होता, पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. त्यापूर्वी सोनी यांनी बालमजुरांवरील एका डाक्युमेंट्रीचे दिग्दर्शन केले होते. सोनी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या नवीन चित्रपटाची निर्मिती पूजा भट्ट आणि दिनो मोरिया यांची कंपनी एकत्रितपणे करणार आहे. सध्या या दोघांच्या भागीदारीमध्ये ‘जिस्म २’ सिनेमाची निर्मिती सुरू आहे.