भविष्यातली आदर्श माता- प्रियांका चोप्रा

मॅट्रिमोनियल पोर्टल शादी डॉट कॉमने नुकत्याच ऑनलाईन केलेल्या सर्वेक्षणात आदर्श सेलिब्रिटी मॉम म्हणून ऐश्वर्या राय बच्चन हीची निवड झाली असून त्यात आश्चर्य वाटण्याजोगे खरेच कांही नाही. करिश्मा कपूर, मलाईका अरोरा-खान, लारा दत्ता यांना मागे टाकून ऐश्वर्याने ५४ टक्के मते मिळवून आघाडी घेतली आहे.
  याच सर्वेक्षणात भविष्यातील आदर्श सेलिब्रिटी मॉम कोण असेल असेही विचारण्यात आले होते व त्याचा निकाल खरा धक्कादायक आहे. या स्पर्धेत करिना कपूरला मागे टाकून अव्वल आली आहे ती प्रियांका चोप्रा.
  आदर्श आई-मुलगी जोडीत सोहा-शर्मिला आणि ट्विंकल-डिंपलवर मात करून हेमा- ईशा देओल आदर्श आई-मुलगी ठरल्या आहेत.

Leave a Comment