दीपिका सोबत काम करण्यास रजनीकांत घाबरला

    वयाने मोठे असलेल्या नायकासोबत यापूर्वी कमी वयाच्या नायिकेने अनेक चित्रपटांतून काम केले आहे. अशा स्वरूपाच्या जोड्यांना प्रेक्षकांनीही स्विकारले आहे. आता आणखी एका चित्रपटाची यात भर पडली आहे. ६१ वर्षाच्या रजनीकांतने २६ वर्षाच्या दीपिका सोबत ‘कोचा दियान’ या चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांतची मुलगी सौंदर्या करीत आहे.
    या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटातील एक गाणे कोरियोग्राफर सरोज खानने केले आहे. हे गोण रोमँटिक असल्याने यावेळी रजनीकांत व दीपिकाला थोडा लव सीन करायचा होता. या गाण्याच्या वेळी सहजता (कम्फर्टेबल) वाटत नसल्याने त्याने सीन करण्यास नकार दिला. याबाबत नंतर कितीतरी वेळ सौंदर्या व दीपिकाने समजावून सांगितल्यानंतर हा सीन करण्यास रजनीकांत तयार झाला.
    यापूर्वी रजनीकांतने वयाने कमी असलेल्या नायिकासोबत कित्येक चित्रपटांतून काम केले आहे. यापैकी बरेच चित्रपट हिट झाले आहेत. ऐश्‍वर्या रॉय सोबतचा ‘रोबोट’ हा चित्रपट हिट झाला. तमिळमधील प्रेक्षकांनी तर हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. रजनीकांतने अनेकदा वयाने कमी असलेल्या नायिकांसोबत काम केले आहे. मात्र त्यावेळी त्याला कधीच वयाने कमी असलेल्या नायिकांसोबत काम करताना असहायता वाटली नव्हती. मात्र आता दिवसेंदिवस वय वाढत असल्याने रजनीकांतला त्याचा त्रास वाटत असावा. विशेष म्हणजे रजनीकांतला स्वत:च्या मुलीसमोर रोमँटिक सीन करण्यास असहायता वाटली असेल.

Leave a Comment