‘रिऍलिटी शो’ वळत आहे चळवळीकडे

    दिवसेंदिवस स्पर्धात्मक स्वरूपाचे ‘रिऍलिटी शो’ पाहून बोअर झालेल्यांना आता काहीसा दिलासा मिळेल, असे वाटत आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या माध्यमातून अभिनेता अमिरखानने त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या नव्या शो मधून सामाजिक चळवळच सुरू केली आहे. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी अमिरखानने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ही ओळख कायम ठेवण्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असते. दिल्लीत क्रांती मैदानावर सुरू असलेल्या अण्णा हजारे यांच्या  भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यासपीठावर आला. त्याचवेळी त्याची सामाजिक प्रश्‍नाबद्दल असलेली ओढ दिसून आली होती.
    अमिर आता ‘सत्यमेव जयते’ या रिऍलिटी शो’च्या माध्यमातून दर रविवारी सामाजिक प्रश्न सोडविणार आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या शोमध्ये त्याने ‘स्त्री भ्रूण हत्या’ या प्रश्नाला हात घातला आहे. यावेळी त्यांनी या शो मध्ये स्टिंग ऑपरेशन करणार्‍या दोन पत्रकारांना बोलविले होते. त्यांनी स्टिंग ऑपरेशनमधून उघडे पाडलेल्या डॉक्टरांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे शो मधून दाखविण्यात आले आहे. याबाबींचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली.
    त्यामुळे आगामी काळात स्पर्धात्मक ‘रिऍलिटी शो’ चा ट्रेंड बदलून ‘सत्यमेव जयते’ मुळे सामाजिक चळवळीकडे वळणारा ठरणार आहे.

Leave a Comment