मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

तसा कथानक “डेव्हलप” होता होता सचिन खेडेकरच्या पात्राला हेताळणी आणि अपमानाला सामोरे जावे लगते.. सारखा “घाटी” शब्द ऐकावा लागतो. आणि मुला-मुलीन्चेही तेच.. मराठी कुटुंब चांगले रंगवले आहे.. त्यात म छत्रपती शिवाजी महाराजाना ह्या भोसलेंची होणारी कुचंबणा नकोशी होउन ते प्रतापगडावरून थेट मुंबईत सचिन खेडेकरांच्या घरी येतात !!  शिवाजी महाराजांचा ‘एंट्री’ सीन मस्त! खरोखरच आज महाराज परत आले तर बर्याचशा प्रसंगांमधे तुलना होउन शिवाजी महाराज  पात्राला (ज्यांचे आडनाव सुद्धा भोसलेच आहे), त्यांच्या वेळेसच्या युक्ति प्रमाणे अडचणीतून बाहेर काढतात.  

ह्यातला शिवाजी महाराजन्वार्चा पोवाडा अप्रतीम !!! सगळ्या शरीरातल रक्त सळसळते !! अधून मधून येउन जाणारे अंकुश चौधरी आणि भारत जाधव एक गाण्यापुरते आहेत. सिद्धार्थ जाधवचे काम ठीक. पोवाड्यावरती एक कोटी खर्च झाला आहे अशी बातमी आहे, ती खरी ही असू शकेल एवढा तो सेट अप्रतीम आहे. 

मराठी माणसाची कैफियत सचिन खेडेकरांनी (झोपेतल्या) स्वगातात चांगली मांडली आहे. 

शेवट गोड व्हावा असा म्हणतात तस महेश मांजरेकरने “निवडणुकांचा” परफेक्ट टाइमिंग गाठला आहे.  आजच्या परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर सक्षम नेते निवडून आणा, हा संदेश छत्रपति  शिवाजी महाराजानां देखिल पटतो! 

शेवटी जाता जाता एकच वाटू लागते की एवढी प्रगत “टेक्नोलॉजी“ असताना देखील आपण रामायण, महाभारत आणि छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील एखादा “” किंवा “” का बनू शकत नाही??? 

Leave a Comment