
हि कथा आहे भारतीय चित्रपट जनक दादासाहेब फाळके यांची.फाळके आपला छपाईचा यशस्वी धंदा काही मतभेद झाल्याने सोडून देतात,परत कधीही यात परतणार नाही हे वचन देऊनच !! कुटुंबाची ( पत्नी सरस्वती आणि दोन मुल) परिस्थिती आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे बेताची असते. अशातच एक दिवस अचनक मोशन पिक्चरचा मुकचित्रपट पाहून त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते.आपणही असाच मुकचित्रपट बनवू या गोष्टीने फाळके झपाटून जातात.मग सुरु होतो त्यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास.पूर्णतः मदत करणारी बायको,आनंदी मुल आणि फाळकेंच्या प्रतिभेवर विश्वास ठेवणारी मित्रमंडळी यांच्या साह्याने फाळके चित्रपटसृष्टीतला पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ ची निर्मिती करतात.
श्री रविंद्र,आपण दर्शविलेल्या चुका लक्षात घेऊन मजकुरात बदल करण्यात आलेले आहेत.
एका चांगल्या चित्रपटाचे अतिशय त्रोटक आणि व्याकरणाच्या अक्षम्य चुका असलेले हे चित्रपट परीक्षण आहे. दादासाहेब फाळके हिंदी चित्रपटाचे जनक असा चुकीचा उल्लेख यात पहिल्याच ओळीत आहे. दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटांचे जनक आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नावही अर्धवट व चुकीचे लिहिलेआहे. दिग्दर्शक परीश मोकाशी आहेत.यापुढे मजकूर प्रकाशित करताना योग्य काळजी घ्याल अशी अपेक्षा करतो.
– रवींद्र चिंचोलकर , पत्रकारिता विभाग , सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, महाराष्टृ.