पुणे, दि.११ – चांगल्या कारसोबत ग्राहकांना सर्वोत्तम सेवासुविधा पुरवल्याबद्दल ‘डीएसके टोयोटा’ने जपानमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात १० पुरस्कार पटकावले. टोयोटा जपानतर्फे नुकत्याच झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘डीएसके टोयोटा’चे संचालक शिरीष कुलकर्णी यांनी हे पुरस्कार स्वीकारले. हे पुरस्कार टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्यवस्थापकीय संचालक हिरोशी नाकागावा व टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘डीएसके टोयोटा’तर्फे राज्यातील आठ जिल्ह्यात नऊ दालने, सहा सर्विस स्टेशनद्वारे ग्राहकांना सेवा पुरवली जाते. प्रत्येक शहरातील दालने आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळेच यापैकी काही दालनांनी २०११ चे पुरस्कार पटकावले आहेत. या सोहळ्यात उत्कृष्ट ग्राहक सेवेबद्दल ‘डीएसके टोयोटा कोल्हापूर’ने प्रथम पुरस्कार पटकावला तर ‘डीएसके बावधन’ला दुसरा पुरस्कार मिळाला. ‘डीएसके टोयोटा’च्या बावधन येथील दालनास उत्कृष्ट ग्राहक सेवेबद्दल ‘सर्विसस स्टार’ पुरस्कारांपैकी दोन स्टार मिळाले. तर ‘डीएसके टोयोटा’ कोल्हापूरला उत्कृष्ट ग्राहक संबंधांबद्दल तीन स्टार पटकावले.