‘सेबी’ ने क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकार वाढविले

बाजार नियंत्रक सेबीने ५०० कोटी रूपयांपर्यंतच्या प्राथमिक समभाग विक्रीच्या प्रस्तावांना मंजूरी देण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार नुकतेच क्षेत्रीय कार्यालयांना दिले.

क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारांमध्ये सेबीने वाढ केली असून, यामुळे या कार्यालयांमधून ५०० कोटी रूपयांपर्यंत भांडवल उभारणीच्या आयपीओला मंजुरी  मिळू शकणार आहे. म्युच्युअल फंड, निरीक्षण या संबंधात या क्षेत्रीय कार्यालयांना अधिकार देण्यात येणार आहेत. सेबी १० नवी क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्याचा विचार करीत असून, बाजाराकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहणार आहे. छोटया छोटया घडामोडींवर अवलंबून व्यवहार करू नये असे सेबीचे गुतवणूकदारांना सांगणे आहे.

गेल्यावर्षी शेअर बाजारातील मंदीमुळे अनेक कंपन्यांच्या आयपीओंना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे आयपीओ प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने सेबीने क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकार वाढविले आहेत

Leave a Comment