`देऊळ’, `गजर’ आणि `मोरया’ या चित्रपटांमध्ये व्ही. शांताराम पुरस्काराची चुरस

चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार २०१२ मध्ये यंदा `देऊळ’, `गजर’ आणि `मोरया’ या चित्रपटांमध्ये विशेष चुरस आहे. यात मोरयाला सर्वाधिक १५, देऊळला १३, तर गजर चित्रपटाला १२ नामांकने मिळाली आहेत. त्या बरोबरीने `शाळा’ आणि `पाऊलवाट’ या चित्रपटांनीसुद्धा कथा, पटकथा आणि संगीत विभागात महत्वाची नामांकने मिळून पुरस्कारांसाठीची चुरस वाढली आहे.
    मराठी चित्रपटसृष्टीतील गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी आणि शांताराम बापूंची गुणग्राहकतेची परंपरा जपण्यासाठी शांताराम एन्टरटेन्मेंटतर्फे दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदाचा २०१२ चा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार १२ मे २०१२ रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.
    चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार २०११ च्या विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली असून, `बाबू बॅण्ड बाजा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,  अभिनेता, अभिनेत्री,  बालकलाकार,  संवाद, ध्वनिमुद्रण असे एकूण ७ पुरस्कार पटकावून बाजी मारली आहे. तर त्याबरोबरीने लालबाग परळ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण पाच पुरस्कार पटकावले. `बाबू बॅण्ड बाजा’तील भूमिकेसाठी मिलिंद शिंदे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर मिताली जगताप सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

Leave a Comment