कोकुयो कॅम्लिन गिनिज बुकमध्ये

camlin

मुंबई, दि. ८ – राष्ट्रीय पातळीवर कोकुयो कॅम्लिनतर्फे ( पूर्वाश्रमीची कॅम्लिन लिमिटेड) घेण्यात येणार्‍या ऑल इंडिया कॅमल कलर कॉन्टेस्ट या चित्रकला स्पर्धेचा समावेश गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाला आहे. या स्पर्धेत देशातील सहा हजार ६०१ शाळांमधील ४८ लाख ५० हजार २७१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. ही स्पर्धा कोकुयो कॅम्लिनतर्फे दरवर्षी ३ ते १५ वयोगटातील मुलांसाठी आयोजित केली जाते. गेल्या ३८ वर्षांपासून सातत्याने ही स्पर्धा होत आहे.

Leave a Comment