
मुंबई, दि. ८ – सार्वजनिक क्षेत्रातील आघडीची बँक असलेल्या सिंडिकेट बँकेला ३१ मार्च २०१२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १३१३ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला. या वर्षात बँकेच्या नफ्यात २५.३३ टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी बँकेला १०४८ कोटी रूपयांचा नफा झाला होता. बँकेच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची उलाढाल २,८३,५५८ कोटी रूपयांवर गेली असून, यामध्ये १६.२४ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी बँकेचा २,४३,९४६ कोटी रूपयांचा व्यवसाय झाला होता. तसेच या वर्षात देशांतर्गत ठेवीमध्येही १६ टक्क्यांची वाढ झाली. ३१ मार्चपर्यंत बँकेच्या ठेवी १,४७,७०७ कोटी रूपयांवर गेल्या होत्या. २०११-१२ मध्ये बँकेचे ‘एनपीए’ चे प्रमाण घटले आहे. वर्षअखेरीस एनपीए ३१८३ कोटी रूपये असून, ‘एनपीए’ चे प्रमाण २.५३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.