कार्बन मोबाईलचा करार

मुंबई, दि. ८ – मोबाईल बाजारात आकर्षक किमतीत मल्टिमीडिया फोन उपलब्ध करून देणार्‍या कार्बन मोबाईलने आपल्या मोबाईलवर डॉल्बी आवाज उपलब्ध करून दिला आहे. डॉल्बी आवाजाची सुविधा असणारा कार्बन केटी-८१ हा पहिला हॅण्डसेट कंपनीने तयार केला आहे. यामुळे मोबाईलधारकांना हॅण्डसेटवर अधिक स्पष्टपणे संगीत ऐकता येणार आहे, असे कार्बन मोबाईल्सचे कार्यकारी संचालक शाहीन देवसरे यांनी सांगितले.

Leave a Comment