इस्टर एग मधून पुन्हा अमिताभ घेणार गाण्याची एंट्री

अमर अकबर अँथनी चित्रपटात अमिताभची इस्टर एगमधून माय नेम इज अॅथनी गोन्साल्व्हिस म्हणत घेतलेली एंट्री आठवतेय? ७७ सालात अतिलोकप्रिय झालेल्या या गाण्याचाच वापर रोहित शेट्टी त्याच्या नांव न ठरलेल्या एका आगामी चित्रपटासाठी करणार असून या गाण्याच्या चित्रीकरणासाठी बीग बीने त्वरीत होकार दिला असल्याचे समजते.
  या चित्रपटात अमिताभची भूमिका नाही मात्र या गाण्यात पूर्वीच्या स्वरूपात तो अभिषेक बरोबर नृत्य करणार आहे. अजय देवगण याचीही या चित्रपटात भूमिका असून ही एक थ्रिलर कॉमेडी आहे असे समजते. या दृष्यासाठी फिल्म सिटीत एक प्रचंड आकाराचे अंडे सेट डिझायनर नरेंद्र राहुरीकर याने बनविले असून हे गाणे टायटल साँग स्वरूपातच आहे. हिमेश रेशमियाचे संगीत असून अभिषेक आणि अजय देवगणही त्यात कांही ओळी गाणार आहेत.
  अमिताभ आणि अभिषेक कजरारे नंतर प्रथमच एकत्र नृत्य करणार असून नृत्य दिग्दर्शक आहेत चिन्नी प्रकाश. मे महिन्यात याचे शूटिंग केले जाणार आहे असे खात्रीलायक वृत्त आहे.

Leave a Comment