आत्तापर्यंत ९२.५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

मुंबई, दि. ८ – राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंत ९२.५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, १५ मे पर्यंत गाळप पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
    आत्तापर्यंत ७६८ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. साधारणपणे ७७५ लाख मेट्रिक टनापर्यंत हा गाळप जाण्याची शक्यता आहे. तर ९२.५० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, उतारा ११.६२ टक्के इतका निघाला आहे. गेल्यावर्षी ८०२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले होते, तर ९० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. जुलैपर्यंत हंगाम लांबला तरी गतवर्षी २५ हजार मेट्रिक टन ऊस शिल्लक राहिला होता. राज्यामध्ये सध्या १७० सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. त्यापैकी १५४ कारखाने बंद झाले आहेत. तर ५१ खासगी कारखान्यांपैकी आता दोन कारखाने सुरू आहेत.
    दरम्यान, यंदाच्या हंगामामध्ये गाळपाविना उस शिल्लक राहणार नाही. परिणामी हंगाम लवकर संपेल, अशी माहिती सहसंचालक अनिल बनसोडे यांनी दिली.

Leave a Comment