ब्लादीमीर पुतीन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ

क्रेमलिन- ब्लादीमीर पुतीन यांनी सोमवारी क्रेमलिन मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या समारंभाला देशातील वरीष्ठ अधिकार्‍यांबरोबरच कांही परदेशी पाहुणेही उपस्थित होते. सहा वर्षांच्या या टर्ममध्ये पुतीन यांच्यासमोर जनतेतील असंतोष, आर्थिक चणचण आणि राजकारणी विरोधकांना तोंड देणे अशी अनेक आव्हाने आहेत. रशियन घटनेवर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली तेव्हा सुमारे दोन हजार लोक उपस्थित होते.
  पुतीन यांची ही तिसरी टर्म असून ५९ वर्षीय या नेत्याने २००८ ते १२ या काळात पंतप्रधानपद भूषविले आहे. मार्चमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत ते भरघोस मतांनी विजयी झाले असून त्यांनी नवीन सरकारमध्ये पंतप्रधानपदासाठी माजी अध्यक्ष त्रिमिती मेदनेदेव यांच्या नावाची शिफारस केली असल्याचेही सांगण्यात आले.